27 July 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता

नवी दिल्ली : नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे अजून एक महाकाय प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे या कंपनीचा मालक अमित भटनागर यांने नरेंद्र मोदी यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यावर जेंव्हा नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा वडोदऱ्याला आले होते, त्यावेळी अमित भटनागर ह्याने विशेष उपस्थिती लावत नरेंद्र मोदी याचं विशेष स्वागत केलं होत. विशेष म्हणजे त्याने तश्या आशयाची पोस्ट २०१४ मध्ये स्वतःच्या फेसबुक पेज वर टाकली होती.

अमित भटनागरचे गुजरात भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबरचे फोटोज समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यावरून त्याचे घनिष्ट संबंध उघड होत आहेत. डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीने २००८ ते २०१६ या कालावधीत २६५४.४० कोटी रुपये इतकं बँक कर्ज घेतलं होत. अमित भटनागरच्या डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिफॉल्‍टर्स लिस्‍ट आणि ईसीजीसीच्या लिस्टमध्ये सामील होते. याच बँक लोणला अखेर २०१६ – १७ मध्ये एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेस्टस) म्हणून घोषित करण्यात आले होते.

याच डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीचा मालक अमित भटनागर जेव्हा नरेंद्र मोदींना २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा वडोदऱ्याला आले होते, तेव्हा अमित भटनागर ह्याने विशेष उपस्थिती लावत नरेंद्र मोदी याचं विशेष स्वागत केलं होत.

बँक गैरव्यवहार प्रकरणी अमित भटनागर सहित अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर अमित भटनागरला सीबीआयने अटक केली असून अन्य आरोपींचा सीबीआय शोध घेत आहे.

या आधी सुद्धा नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर दावोस येथे गेले होते, तेव्हा सुद्धा पीएनबी घोटाळ्यातला प्रमुख आरोपी नीरव मोदी सुद्धा तेथे उपस्थित असल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींचे वडोदऱ्याला स्वागत करतानाचे फोटोज स्वतः अमित भटनागर यानेच फेसबुक वरून २०१४ मध्ये प्रसिद्ध केले होते. इतकेच नव्हे तर गुजरात भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्याचे जवळचे संबंध असल्याचे विविध फोटोंमधून समोर येत आहे.

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x