14 November 2019 1:05 PM
अँप डाउनलोड

राष्ट्रकुल स्पर्धा, महिला स्पर्धक जोमात; मनूला सुवर्ण तर हीनाला रौप्य पदक

सिडनी : सिडनीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १६ वर्षाच्या मनू भाकेरने आणि हिना सिंधू या दोघींनी १० मीटर्स एअर पिस्टल प्रकारात भारतासाठी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं.

१६ वर्षीय मनू भाकेरने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पणातच आणि इतक्या कमी वयातच सुवर्ण पदक कमविण्याचा विक्रम केला आहे. मनू भाकेरने आणि हिना सिंधूने १० मीटर्स एअर पिस्टल प्रकारात ही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मनूने २४०.९ गुणांची कमाई करत थेट सुवर्ण पदकचं कमावलं तर हिना सिंधूने २३४ गुणांची नोंद करत रौप्य पदकावर दावा केला.

पुरुष गटात १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रवी कुमारने कांस्यपदक कमावलं तर वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ९४ किलो वजनी गटात विकास थालियानेही कांस्यपदक कमावलं.

हॅशटॅग्स

#CWG 2018(2)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या