28 June 2022 10:43 AM
अँप डाउनलोड

गुगल पेमेंट सेवांशी संबंधित डेटा भारतात स्टोर करणार, डिसेंबरपर्यंत वेळ मागितला

नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील आणि इंटरनेट क्षेत्रातील महाकाय कंपनी गुगलने त्यांच्या पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. गुगलला त्यासाठी भारतात सर्व्हर बसवावे लागतील. परंतु, गुगलने त्यासाठी केंद्र सरकारकडून येत्या डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे.

मागील महिन्यात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी कॅलिफोर्निया’स्थीत गुगलच्या कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान, गुगलचे विद्यमान सीईओ सुंदर पिचाई आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यात बराचवेळ चर्चा झाली होती. यावेळी गुगलकडून आरबीआय’ने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली होती.

आरबीआय’ने याआधीच ग्राहकांच्या सुरक्षतेसाठी पेमेंट सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपनांना तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित कंपन्यांनी पेमेंट सेवा संबंधित सर्व डेटा (सर्व्हर) भारतात स्टोअर केला पाहिजे. यासाठी आरबीआय’ने कंपन्यांना ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यात गुगलने सुद्धा भारतात पेमेंट सेवांशी संबंधित सुविधा सुरु केल्या आहेत. त्याला अनुसरूनच गुगलने केंद्र सरकारकडून थोडा वेळ मागितला आहे.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x