26 April 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय 'व्हाइट हाउस'कडून मोदी अनफॉलो

USA President Office, White House, Unfollow PM Narendra Modi

वॉशिंग्टन, २९ एप्रिल: एकाबाजूला आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन सरकारच्या वॉचडॉग ग्रुपने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात भारताला २००४ नंतर आतापर्यंत सर्वात वाईट रेटिंग दिलं आहे. या अहवालात भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत चाललेल्या १४ देशांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.

त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन म्हटलं आहे की, २००४ नंतर प्रथमच यूएससीआयआरएफने भारताला काही चिंताग्रस्त असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट करण्याचं सुचवलं आहे. यूएससीआयआरएफचे उपाध्यक्ष नेन्डिन माएजा म्हणाले नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीमुळे लाखो भारतीय मुस्लिमांना ताब्यात घेण्याची, हद्दपारी आणि राज्यविहीन करण्याचा धोका आहे. अमेरिकन कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम यांनी हे रेटिंग दिले आहे. परदेशात धार्मिक स्वातंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी जबाबदार असणारी ही सरकारी संस्था आहे. या अहवालावर अमेरिकेची प्रतिक्रिया यायची आहे.

दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. करोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.

व्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

 

News English Summary: The PM of India Narendra Modi has been unfollowed by the White House on Twitter. The White House began to follow in their footsteps after helping the United States with hydroxychloroquine drugs in the fight against the corona. The White House has unfollowed six Twitter handles, including Prime Minister Modi, the Prime Minister’s Office and the Rashtrapati Bhavan.

News English Title: United States of America president office white house unfollows PM Narendra Modi on twitter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x