मुंबई – शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून म्हटलं आहे की,’जे स्वतः चमचेगिरीतुन पुढे आले, ज्यांची स्वतःची नोकरी धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर अवलंबून आहे, त्यांनी कर्तृत्ववान माणसांच्या खुर्चीची काळजी करू नये…महाभारतात संजयचा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो, टीम सिलेक्टरचा नव्हे…!

मराठा आरक्षणारुन राज्यात हिंसाचार वाढायला सुरुवात झाली आणि राज्यातील वातावरण तापू लागले असताना संजय राऊत यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याची टिपणी केली. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपकडून नाराजी उमटली असून भाजपच्या महाराष्ट्र आयटी सेल’ने तिखट प्रतिक्रिया ट्विटर द्वारे व्यक्त केली आहे.

त्यानंतर दुसरं भाजपच्या आयटी सेलने पुन्हा एका ट्वीटमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ‘व्हेकन्सी’ नसल्याचा खोचक टोला सेनेला लगावला आहे. संजय राऊतांनी विधान केलं होत की,’महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या नसून तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असं धक्कदायक विधान त्यांनी केलं होत.

BJP Maharashtra IT Cell target Shiv Sena MP Sanjay Raut on CM statement