26 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

वानखेडेंचे कुटुंब पहिल्यापासून हिंदूच असल्याचं सांगणाऱ्या क्रांती रेडकर यांची माहिती खोटी | डॉ. कुरेशींकडून पोलखोल

Sameer Wankhede's Religion Exposed

मुंबई, 28 ऑक्टोबर | एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी प्रसार माध्यमाशी बातचीत करताना अनेक खुलासे केले आहेत. आपली नाहक बदनामी होत आहे आणि त्यामुळे सत्य लोकांसमोर मांडणं महत्वाचं असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना (Sameer Wankhede’s Religion Exposed) म्हटलं आहे.

Sameer Wankhede’s Religion Exposed. The father of Sameer Wankhede’s first wife, Dr. Zahid Qureshi’s first reaction has come forward. Sameer Wankhede’s family was formerly Muslim, said Dr. Sameer Wankhede’s first father-in-law. Zahid Qureshi has made several revelations while interacting with the media :

डॉ. जाहीद कुरेशी काय म्हणाले?
समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते. शबाना कुरेशीसोबतचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार पार पडला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होते, समीरच्या बहिणीचेही लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे”, असं त्यांनी सांगितलं.

समीर वानखेडेंचे कुटुंब हिंदू आहे हे आम्हाला माहित नव्हते. जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आले तेव्हा आम्हाला कळले की ते हिंदू आहेत. समीर वानखेडेंची आई मुस्लिम होती आणि आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते”, असंही ते म्हणाले. तसेच, सध्या आम्हाला या प्रकरणात पडण्याची गरज नाही आणि आम्हाला यावर बोलायचेही नाही, असं डॉक्टर कुरेशी यांनी सांगितलं.

मात्र आम्ही एंगेजमेंट झाल्यानंतर चौकशी केली होती आणि त्यांच्या वडिलांनी देखील तेच म्हटलं होतं. ते कुटुंब मुस्लिम असल्यानेच आम्ही लग्नाला होकार दिला होता आणि त्यानंतर निकाह मुस्लिम धर्माच्या प्रथेप्रमाणे पार पडला होता. आम्ही त्यांच्या कुटुंबाला चार वर्षांपासून ओळखत होतो आम्ही त्यांच्या घरी देखील जायचो आणि त्यानंतर खात्री झाल्यानंतर दाऊद वानखेडे म्हणाले की आम्ही धर्म बदललेले मुस्लिम आहोत ते जी कागदपत्र आज दाखवत आहेत ती जुनी कागदपत्र आहेत आणि जुन्या कागद पत्रांवर अर्थात जुना रेकॉर्डच असणार असं डॉ. जाहीद कुरेशी म्हणाले. त्यामुळे वानखेडे कुटुंब पहिल्यापासून हिंदूच आहेत आणि ते कधीच मुस्लिम नव्हते हा क्रांती रेडकर यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं डॉ. जाहीद कुरेशी यांच्या स्पष्टीकरणातून समोर आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Wankhede’s Religion Exposed by his first father and Law.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x