14 April 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

हिंदू देवी-देवतांचा अपमान करणारे भाजप नेत्यांचे सर्व जुने व्हिडिओ लवकरच लोकांसमोर येणार, भाजप-शिंदे गटाची कोंडी होणार

BJP Maharashtra

BJP Maharashtra | हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. वास्तविक हा व्हिडिओ २००९ मधील असून त्याचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नव्हता, तसेच २००९ पासून या व्हिडिओवर व्यक्त न होणारी राजकीय स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यात मोजकेच लोकं दिसत असले तरी त्यांना प्रसिद्धी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. एकूण विषय पुरस्कृत असल्याचं म्हटलं जातंय. आज ठाण्यात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ असा आरोप करत भाजपच्या जवळील राजकीय वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी उद्या (17 डिसेंबर) मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निषेध यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर बोलण्यास चुप्पी साधली आहे.

विरोधक भाजप-शिंदे गटाला उघडं पाडणार
दरम्यान, २००९ मधील व्हिडिओवर २०२२ मध्ये व्यक्त होणाऱ्या भाजप-शिंदे गटाची मोठी राजकीय गोची केली जाणार असल्याचं वृत्त आहे. कारण विरोधकांचा एक गट सध्या भाजप नेत्यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केलेली सर्व वक्तव्य आणि त्याचे व्हिडिओ एकत्र करत आहेत. आता भाजपाला धडा शिकवायचाच असा निश्चय करण्यात आल्याचं वृत्त आहे. काम पूर्ण होताच ते प्रसार माध्यमांकडे पोहोचवून त्यावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना प्रश्न विचारण्याचा धडाका लावला जाणार आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यांचे अनेक व्हिडिओ आहेत त्यात हिंदू देवी देवतांबद्दल अत्यंत संतापजनक वक्तव्य करण्यात आली होती. त्यानंतर फडणवीस आणि शिंदेंना त्यावर घेरलं जाणार आहे असं वृत्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Old video of BJP leaders on Hindu Devi Devata will be viral soon check details on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#BJP Maharashtra(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x