28 June 2022 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

त्या गाणार होत्या | म्हणून पोलिसांच्या कल्याणार्थ कार्यक्रमात पोलिसांनाच तिकीट विक्रीच काम दिलेलं

Aurangabad Sangeet Rajani program 2017, Police Sell tickets, Amruta Fadnavis

मुंबई, २२ मार्च: २०१७ मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वादाचं कारण होतं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्त्यव्य सोडून या कार्यक्रमाचे तिकिट विकायला भाग पाडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या तिकिटांची किंमत किंमत ५१ हजार रुपये इतकी होती. सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘पोलिस रजनी’ संगीत कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. अमृता फडणवीस यांचा हा कार्यक्रम हाऊस फुल्ल होण्यासाठी या कार्यक्रमाची तिकिटे विकण्याची जबाबदारी थेट पोलिसांवर टाकण्यात आली होती. या कार्यक्रमाचं एक तिकट ५१ हजार रूपयाचं असल्यानं पोलिसांना तिकीट खपवण्यासाठी उद्योगपती आणि बड्या असामींचे उंबरठे पोलिसांना झिजवावे लागत होते.

अमृता फडणवीस कार्यक्रमासाठी सदिच्छा दूत म्हणून काम पाहत असल्याने या कार्यक्रमात त्या गाणी गाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना मोठ्या हस्ती या कार्यक्रमात हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची वृत्त सर्वत्र झळकली होती.

माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद शहर पोलिसांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस यांना गुडविल अॅम्बेसिडर बनविण्यात आलं होतं. पोलिसांच्या कल्याणार्थ आयोजित या कार्यक्रमात अमृता फडणवीस गाणार असल्याचा दावा अनेक वर्तमानपत्रात करण्यात आला होता.

पोलिसांच्या कल्याणार्थ आयोजित या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून ५१ हजार रूपयाचं एक तिकीट ठेवण्यात आलं होतं. अशी ४०० तिकिटे छापण्यात आली होती आणि ही तिकिटे विकण्याचं काम औरंगाबाद शहराच्या हद्दीतील १५ पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांपासून ते हवालदारापर्यंत सर्वांनाच ही तिकिटं विकण्याचे फर्मान सोडण्यात आलं होतं असा दावा अनेक वृत्तपत्रांनी केला होता. हे अत्यंत महागडे तिकीट विकण्यासाठी शहरातील बडे नेते, हॉटेलमालक, ढाबेवाले आणि उद्योगपतींच्या कार्यलयात पोलीस चकरा मारताना दिसत होते, असंही त्या वृत्तात दिलेल्या बातमीत म्हटलं होते.

ही बातमी आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्याला आक्षेप घेतला होता. कोणाच्या आदेशामुळे पोलिसांना ही महागडी तिकिटं विकण्याचं काम देण्यात आलं, हे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं पाहिजे. ही तिकिटे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विकली आहेत काय? त्याचा खुलासा पोलीस आयुक्तांनी करायला हवा, अशी मागणी सावंत यांनी केली होती. जर ही तिकिटे अशा लोकांना विकली असतीलल तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही सावंत यांनी केला होता. तर केवळ १५ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना तिकीट विकण्याची जबाबदारी देण्यात आल्याचं औरंगाबादमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं.

 

 

News English Summary: Chief Minister Devendra Fadnavis’ wife Amrita Fadnavis’s’ Police Rajani ‘concert was controversial. Amrita Fadnavis’ responsibility for selling tickets for the event was placed directly on the police. As a ticket for this event cost Rs.51000.

News English Title: Aurangabad Sangeet Rajani program 2017 Police had got target to sell tickets news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x