4 December 2020 7:47 PM
अँप डाउनलोड

राममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नकाः चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Ram Mandir

औरंगाबाद : नरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व उघडे पाडण्यात यशस्वी झालो तर निवडणुकीत यश हमखास मिळेल. पण त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, असे बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले असे म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री झाले. मुलालाही मंत्री केले, अशी टीकाही पाटील यांनी केली.

तत्पूर्वी, नाशिक भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वगैरे नाही. हे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सारखं असतं. सकाळी नाराजी असते संध्याकाळी एकत्र चहा घेतात. मतं वेगळ असतात आणि हे नैसर्गिक आहे, असं ते म्हणाले.

 

News English Summery: BJP state president Chandrakant Patil told the Aurangabad office bearers that Narendra Modi made Ram temple in Ayodhya so people would vote for him. He was speaking at a meeting of the office bearers. He further said that if the Shiv Sena succeed in unleashing the Hindutva, the success in the elections will be assured. But it requires effort. Balasaheb Thackeray became the chief minister who told Shiv Sena that he was the chief minister. Patil also criticized the boy as a minister.

 

Web News Title: Story only Ram Mandir issue does not convert to vote says BJP State President Chandrakant Patil in Aurangabad.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x