15 December 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

सरकार नियमानुसार अर्नबची काळजी घेतेय | राज्यपालांनी जास्त चिंता करू नये - छगन भुजबळ

मुंबई, ९ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात (Arnab Goswami in Taloja Jail) ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना देखील राज्याच्या राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोला देखील छगन भुजबळ यांनी लगावला.

छगन भुजबळ यांना नाशिक येथील पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा छगन भुजबळ यांनी राज्यपालांना काळजी न करण्याचा सल्ला दिला. नियमानुसार अर्णव गोस्वामी यांची सर्व काळजी घेतली जाईल. परंतु, राज्यपाल छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याची मिष्किल टिप्पणी यावेळी भुजबळ यांनी केली.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of the Republican News Channel, who is currently in custody in connection with the Anvay Naik Suicide Case, has been remanded in custody at the Taloja Jail. It was decided to keep him in jail for security reasons. Meanwhile, Governor Bhagat Singh Koshyari has discussed the matter with Home Minister Anil Deshmukh. Governor Bhagat Singh Koshyari has expressed concern over the health and safety of Arnab Goswami.

News English Title: Minister Chhgan Bhujbal reply to governor Bhagat Singh Koshyari over Arnab Goswmi safety news updates.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x