6 December 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या
x

Unique Digital Health ID | वन नेशन-वन हेल्थ कार्ड | असं ऑनलाईन बनवा - वाचा सविस्तर

Unique Digital Health ID

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर | केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ नंतर आता ‘वन नेशन-वन हेल्थ कार्ड’ या योजनेचा (One Nation One Health Card) आज शुभारंभ होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Unique Digital Health ID) देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! (National Digital Health Mission-NDHM).

Digital Health Mission Launch, This is How Your Health ID Will Help Maintain Medical Records :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑग्सट २०२० रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. सध्या ही योजना देशातील अंदमान-निकोबार, चंदीगढ, दादरा व नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीप या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवली जात आहेत.

काय आहे नॅशनल हेल्थ मिशन?
केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.

आरोग्य ओळखपत्र कशासाठी?
एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते. तेव्हा त्या व्यक्तीला फाईल घेऊन जावं लागतं. त्या फाईलमध्ये जुन्या तपासण्यांचे वा आजाराच्या निदानाबद्दलचे रिपोर्टस असतात. याच फाईलचं डिजिटल रुप म्हणजे हे आरोग्य ओळखपत्र असणार आहे. आधार कार्डाप्रमाणे १४ अंकी यूनिक ओळखपत्र नागरिकांना दिलं जाणार आहे.

याच १४ अंकी कार्डमध्ये त्या व्यक्तीच्या आजाराच्या, चाचण्यांच्या आणि उपचाराच्या नोंदी घेतल्या जातील. हे कार्ड केंद्रीय सर्व्हरला जोडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही उपचार घेण्यासाठी गेल्यास मागील रिपोर्टस दाखवण्यासाठी या कार्ड गरजेचं ठरणार आहे. या कार्डावरील क्रमांकावरून डॉक्टरांना लगेच तुमच्या जुन्या आजारांविषयी वा हेल्थ हिस्ट्रीबद्दल माहिती कळेल.

असं बनवा हेल्थ कार्ड:
* https://healthid.ndhm.gov.in/register या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचं हेल्थ कार्ड स्वतः बनवू शकता.
* त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवर NDHM हेल्थ रेकॉर्ड अॅपही उपलब्ध आहे. त्या अॅपच्या माध्यमातून आपण हेल्थ कार्डसाठी नोंदणी करु शकता.
* याशिवाय सरकारी वा खासगी रुग्णालये, कम्युनिटी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सेवा केंद्रावर जाऊनही हे कार्ड बनवू शकता.

कार्ड कसे बनवणार ?
* सर्वात आधी https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जा.
* आधारच्या मदतीने ओळखपत्र काढण्यासाठी सर्वात आधी ‘जनरेट व्हाया आधार’ यावर क्लिक करा.
* तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून हेल्थ कार्ड काढायचं असेल तर जनरेट व्हाया मोबाईल यावर क्लिक करा.
* आधार वा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.
* आता एक फॉर्म ओपन होईल. त्यात विचारण्यात आलेली सर्व माहिती कागदपत्रांच्या आधारे भरा.
* ही माहिती भरल्यानंतर सबमिट म्हणा. त्यानंतर तुमचं ओळखपत्र तयार होईल.
* यासाठी दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे आधार कार्ड किंवा मोबाईल. दुसरी म्हणजे नाव, जन्म वर्ष, लिंग, पत्ता यासारखी महत्त्वाची माहिती भरावी लागेल. यासाठी कसलीही कागदपत्रं जमा करावी लागणार नाही.

काय फायदा होणार?
* तुमचं १४ क्रमांकाने ओळखपत्र तयार झाल्यानंतर त्यावर तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती नोंदवली जाईल. म्हणजेच तुमची हेल्थ हिस्ट्री त्यात जमा होत राहणार. जेव्हा केव्हा तुम्ही रुग्णालयात जाल, तेव्हा फक्त हे कार्ड घेऊन जावं लागणार.
* या कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्याबद्दलची पूर्वीच्या आजारांविषयीची, तुम्ही घेतलेल्या उपचारांविषयीची, तसेच तुम्हाला असलेल्या इतर व्याधींची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
* हे ओळखपत्र दाखवल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांची माहिती मिळणं सोप्प होईल. त्यामुळे नव्याने आजाराचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या करण्याची गरज पडणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: How to apply for Unique Digital Health ID online in Marathi.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x