पुलवामा : काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. सांगली जिल्ह्यातील CRPF जवान राहुल करांडे हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले.
राहुल करांडे हे विठुरायाची वाडी गावचे रहिवाशी आहेत. समस्त सांगलीकरांवर या दुःखद घटनेमुळे शोककळा पसरली आहे. सीआरपीएफकडून शहीद जवानांबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सांगली जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
CRPF च्या माहितीनुसार, रस्त्यावर एका ४ चाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.
