26 April 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

मोदींचं ट्विट! लोकं लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत...नेटिझन्स म्हणाले तुमच्यामुळेच

News Latest Updates, PM Narendra Modi, Corona Crisis Lock Down

नवी दिल्ली, २३ मार्च : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कलम १४४ जमावबंदी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. राजधानी दिल्लीच्या सीमा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. लखनऊ, नोएडासह युपीच्या १६ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी २२ राज्यांमधील सरकार आपआपल्या पद्धधतीने उपाययोजना करत आहे. जनता कर्फ्यूनंतर सोमवारी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

देशभरात रविवारी कोरोनाच्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ७ वर गेली आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९१ वर पोहोचली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

दरम्यान, “लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले आहे. मात्र मोदींच्या या ट्विटवर नेटिझन्सनी मोदींनाच धारेवर धरल्याचे दिसत आहे आणि त्यांनीच लोकांच्या मानसिकतेचा विचार न करता लोकांना सध्या गरजेचं नसताना देखील आवाहन केलं आणि त्यामुळे शांत असलेली लोकं रस्त्यावर मिरवणुका काढताना दिसले जणू ही राष्ट्रीय आपत्ती नसून एखादा उत्सवच आहे.

 

News English Summery:  Corona risk is rising worldwide. More than 13,000 people have died. In the last two days, there has been a rapid increase in coronary patients in India. The number of coronary patients in India has now reached around six. Maharashtra has the highest number of patients with 89. Therefore, concerns are being expressed at all levels. Lock down orders have been issued in 22 states and 80 districts around the country to prevent a growing infection of corona. Meanwhile, “People are not taking lock down seriously. Please save yourself, save your family, obey orders and state governments should follow the rules of the people. But netizens seem to be holding Modi over this tweet. And they are the ones who give people what they don’t need right now, regardless of their mentality The crowd appealed and the people who were quiet saw the procession taking to the streets as if it were not a national disaster but a celebration.

 

News English Title:  Story PM Narendra Modi reacted over peoples after lock down News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x