गुजरात राजकीय मॉडेलच्या धर्तीवर शिंदे गटातील अनेक खासदार-आमदारांची तिकिटं आयत्यावेळी कापली जाणार? मोठी व्यूहरचना

Loksabha Election 2024 | 2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलीये. भाजपनं मिशन 144 निश्चित केलंय. त्यासाठी प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीही सुरू केलीये. भाजपच्या मिशन 144 मध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातीलच एक आहे, औरंगाबाद. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने युती करत राज्यात सरकार स्थापन केलंय. मात्र, आता भाजपमुळेच शिंदे गटाचं (बाळासाहेबांची शिवसेना) टेन्शन वाढलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची याच बाल्लेकिल्ल्यात म्हणजे औरंगाबादेत सभा होतेय.
शिंदे गटातील आणि भाजपमधील कोणाला दूर ठेवायचं आधीच ठरलंय?
दुसरीकडे, जेपी नड्डा यांची आज औरंगाबादेत सभा होत असून या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं असून आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंडे भगिनींचा काहीच रोल नसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
144 नव्हे १६० लोकसभेच्या जागा भाजपाला असुरक्षित :
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांतील बदल आणि बिहार तसेच महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला आगामी लोकसभेच्या ‘असुरक्षित’ जागांची यादी पक्षाच्या अंतर्गत मूल्यमापनात १४४ वरून १६० पर्यंत वाढविणे भाग पडले असून, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागांवरून मोदी शहांची चिंता प्रचंड वाढल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
आगामी लोकसभेच्या ‘असुरक्षित’ जागांच्या यादीचा आढावा घेण्यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या यादीमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले आणि कोणत्या चुका त्याला कारणीभूत ठरल्या यावर सखोल चर्चा पार पडली. मोदी सरकारमधील मंत्र्यांना संघटनात्मक कार्य करण्यासाठी आणि केडरमध्ये जमिनी स्थरांवरील कामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिहारमध्ये राजकीय विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. कारण जनता दल (यू), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे पक्ष यांसह सात सदस्यीय महाआघाडी या भाजपविरोधात उभे राहिल्यामुळेआगामी लोकसभा २०२४ मध्ये या अनेक जागा जिंकण्यात अडचणी येतील, असं स्पष्ट म्हटलं गेलंय. ही संख्या आधीच्या यादीतील चारवरून अद्ययावत यादीत १०-१२ जागांवर करण्यात आली आहे. बिहारमधील असुरक्षित जागांच्या यादीत नवादा, वैशाली, वाल्मिकी नगर, किशनगंज, कटिहार, सुपौल, मुंगेर, झंझारपूर, गया आणि पूर्णिया या जागा आहेत. तसेच येथे भाजप येथे ७० ते ८० टक्के लोकसभा जागा गमावून बसणार असे संकेत देण्यात आले आहेत. परिणामी मोदी-शहांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात मोठा फटका बसणार :
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती तुटल्याने आणि शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट यांच्यात झालेली फाटाफूट यामुळे बरीच कटुता निर्माण झाली असून, भाजप विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे तसेच फडणवीसांचा शिवसेना फोडण्याचा सल्ला मोदी-शहांच्या २०२४ मधील मनसुब्यांवर पाणी फिरवणारा एक घटक ठरू शकतो असं देखील या बैठकीत म्हटलं गेलंय.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा केलेला प्रयत्न देशातील मोठ्या प्रमाणातील हिंदूंना सुद्धा न पटल्याने तोही फटका बसणार असं भाजपाला वाटू लागलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टातील निर्णय जर शिंदेच्या विरोधात गेल्यास अनेकांचं राजकीय आयुष्य धुळीस मिळेल, त्याला देखील फडणवीसांचाच चुकीचा सल्ला कारणीभूत असेल असं या दिल्लीतील भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे. परिणामी भाजपच्या लोकसभेच्या अनेक जागा देखील धोक्यात येतील असं सांगताना ती संख्या एकाआकडी सुद्धा असेल असा रिपोर्ट आल्याचं म्हटलं गेलंय.
शिंदे गटातील अनेक खासदारांविरोधात भाजपचे दिल्लीतील प्रमुख एक व्यूहरचना आखत आहेत आणि त्याच कारण म्हणजे त्यातील अनेक खासदार पराभूत होणार असल्याचं या बैठकीत म्हटलं गेलंय. त्यामुळे उद्या जरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार झाले तरी मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी दूर करण्यासाठी गुजरात प्रमाणे आयत्यावेळी येथे वेगळ्याच उमेदवाराला तिकीट दिलं जाईल जेणे करून मतदारांचा रोष कमी करण्यात येईल असं या दिल्लीतील नेत्याने म्हटले. शिंदे हे काही महाराष्ट्रात राजकीय ब्रँड किंवा चेहरा असं अजिबात नसल्याची खात्री दिल्लीतील भाजपाला पटली आहे.
पाटणा येथे आयोजित आढावा बैठक
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांतील लोकसभेच्या १०० ‘असुरक्षित’ जागांचा सामना करणाऱ्या विस्तारक किंवा पूर्णवेळ पक्षाच्या कार्यकर्त्यांशी दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २१ डिसेंबर रोजी पाटणा येथे बैठक झाली. या बैठकीला आढावा व प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्यांमध्ये सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष, संयुक्त सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश, सरचिटणीस सुनील बन्सल, बिहारचे प्रभारी विनोद तावडे आणि सहप्रभारी हरीश द्विवेदी यांचा समावेश होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Loksabha 2024 BJP rally in Maharashtra check details on 02 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये