16 April 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

पिंपरी-चिंचवड | भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी, भाजपची कीव येते | भाजप नगरसेविकेचा आरोप

BJP corporator Asha Shedge

पिंपरी-चिंचवड, २४ सप्टेंबर | भारतीय जनता पक्ष हा लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहत आहे. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय संबोधलं जातं, अशा शब्दात पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका आशा शेगडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या बोर्डावर आणि अभियंत्याच्या खुर्चीवर शाफी फेकल्याप्रकरणी शेडगे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतलं.

भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी, भाजपची कीव येते, भाजप नगरसेविकेचा आरोप – Pimpri Chinchwad Municipal Corporation BJP corporator Asha Shedge criticizes BJP leaders over supporting corrupt leaders of party :

पिंपरी-चिंचवड भाजपची मला कीव येते. भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय म्हणतो, अशा शब्दात नगरसेविका आशा शेडगे यांनी स्थानिक भाजपवर टीका केलीय. 6 महिन्यांवर येऊन ठेपलेली महानगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावेळी पुढील वेळ आणि येणारा प्रसंगच ठरवेल, असं सूचक वक्तव्यही शेडगे (BJP corporator Asha Shedge) यांनी केलंय.

पिंपरीत भाजपाला खिंडार:
आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांच्या उन्नतीसाठी अरुण पवार गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी भाजपमध्ये विविध पदे भूषवली आहेत. ते आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक होते. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि अतुल शितोळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation BJP corporator Asha Shedge criticizes BJP leaders over supporting corrupt leaders of party.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x