25 September 2020 9:35 PM
अँप डाउनलोड

कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे: अब्दुल सत्तार

Minister Bacchu Kadu, Minister Abdul Sattar, Shivsena, Farmers Loan

औरंगाबाद: दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते एनआरसीला समर्थन करतील, असं वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला भारतीय जनता पक्षाला दिला होता.

मात्र मंत्री पदी विराजमान होऊन देखील बच्चू कडू शेतकरी प्रश्नांवरून ते ठाकरे सरकारला देखील प्रश्न विचारात असल्याने ठाकरे सरकारमधील दुसरे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडू यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 80 टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतली जाणार आहे. मात्र असे असूनही, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी यावेळी दिला.

तत्पूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांची प्रशंसा करता ठाकरे सरकारला देखील टोला लगावला होता. निलेश राणे यांनी ट्विट करताना बच्चू कडू यांच्याबद्दल म्हटलं होतं की, “तुमच्यासारखा वाघ ह्या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकार मध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता… राजीनामा देऊन वेगळे व्हा”, असं ट्विट केलं करत ठाकरे सरकारला देखील टोला लगावला होता.

 

Web Title:  Minister Abdul Sattar suggested Minister Bachhu Kadu to left from Thackeray Government over Farmers loan issue statement.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(921)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x