27 July 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला

Konkan, Devendra Fadnavis, Sharad Pawar

रत्नागिरी, १० जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.

निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आज (१० जून) रत्नागिरीला भेट दिली. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. दौऱ्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्याविषयी बोलताना पवार म्हणाले,”मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असं पवार म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, अशी मागणी पवारांनी केली आहे.

 

News English Summary: I come from a drought stricken area like Baramati. Devendra Fadnavis comes from Vidarbha. It has nothing to do with the sea. So it’s good if they’re coming. Everyone will understand this situation, knowledge will increase, ”said Pawar.

News English Title: NCP President Sharad Pawar reaction on Fadnavis Kokan tour News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x