22 September 2023 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी? Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
x

देशात २४ तासांत १२, ३७५ नवे कोरोनाबाधित, ३८८ रुग्णांचा मृत्यू

Corona Virus, Covid 19, India

नवी दिल्ली, ११ जून: देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ९९९६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ४१ हजार ०२९ झाली आहे. सध्या देशात १ लाख ३७ हजार ४४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत ८ हजार १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ८०८ लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत ५२ लाख १३ हजार १४० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बेंगळूरु या सहा शहरांमध्ये केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत. आठवडाभर ही पथके संबंधित शहरांमधील आरोग्याच्या सुविधांचा आढावा घेऊन दररोज राज्याच्या आरोग्य मंत्रालयाला तसेच केंद्र सरकारला अहवाल सादर करतील. या भेटीनंतर संपूर्ण अहवाल केंद्राला सादर केला जाईल. १५ राज्यांमध्ये ५० केंद्रीय पथके पाठवण्यात येणार असून, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर आणि सोलापूर या शहरांना केंद्रीय पथके भेट देणार आहेत.

 

News English Summary: The number of corona patients in the country is increasing rapidly. In the last 24 hours, there has been an increase of 9996 new corona patients and 357 deaths. According to the Ministry of Health, the total number of patients in the country has reached 2 lakh 86 thousand 579.

News English Title: Corona virus Cases In India 287155 Cases And 8107 Deaths News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x