13 May 2021 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा अचानक राजीनामा

Journalist Pradeep Bhandari, Resigned, Republic TV

मुंबई, ०९ फेब्रुवारी: रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांनी राजीनामा दिला आहे. सध्या रिपब्लिकचे अनेक कर्मचारी टीआरपी घोटाळ्यात अडकले असून अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अगदी स्वतः अर्णब गोस्वामी तसेच CEO देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अभिनेत्री कंगना रानौतच्या वांद्रे पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती तेव्हा प्रदीप भंडारी प्रकाशझोतात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची अडवणूक केली होती आणि त्यानंतर सरकारी कामात अडथळे आणल्याने त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रदीप भंडारी यांना मुंबई सत्र न्यायालयानेसशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

रिपब्लिक टीव्हीचा कायदेतज्ज्ञांच्या टीमवर देखील प्रचंड खर्च वाढला आहे. त्यात टीआरपी घोटाळा आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात चीफ अकाउंटंट टीम देखील रडारवर आहे. सर्व प्रकरणं थेट न्यायालयात असल्याने आणि त्यात अर्णब गोस्वामींचं व्हाट्सअँप चाट लीक झाल्याने रिपब्लिकच्या टीमवर मोठ्या दबाव आहे.

 

News English Summary: Republic TV journalist Pradip Bhandari has resigned. Currently, many Republican employees are involved in the TRP scam and many have been charged. Even Arnab Goswami himself and the CEO are on the radar of Mumbai Police.

News English Title: Journalist Pradeep Bhandari has resigned from Republic TV news updates.

हॅशटॅग्स

#india(201)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x