17 May 2021 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व तौते चक्रीवादळ, प्रशासन सतर्क | रायगडमध्ये 25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
x

जळगावमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करणार | राष्ट्रवादी संवाद यात्रेत खडसेंची गर्जना

NCP, Jalgaon, Eknath Khadse

जळगाव, ०९ फेब्रुवारी: राज्यात संवादाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुचना याव्यात आणि त्यातून राष्ट्रवादीच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी संपूर्ण राज्यातील संघटना बळकट करत आहे. तसेच संघटना आणि पक्ष यांच्यातील संवाद वाढावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रत्येक तालुका-जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा निर्माण करून राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान सध्या जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जळगावात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत मोठी तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे, असा आत्मविश्वास एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ते मंगळवारी चाळीसगावमधील सभेत बोलत होते. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा, इथे जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. यावेळी भाजपमधील खडसे यांच्या डझनभर समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

News English Summary: Great preparations were made in the presence of Eknath Khadse. The NCP is the number one party in Maharashtra. Then the party should come to number one in Jalgaon district too. Eknath Khadse assured the workers that this success is to be achieved.

News English Title: NCP will be top party in Jalgaon said Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x