20 April 2024 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

सत्य समोर येतंय | पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवकाने चोरल्याचा संशय | अन इथेच शिजलं?....

Pune BJP, corporator Dhanraj Ghogare, Pooja Chavan, Steal laptop

पुणे, ०४ मार्च: राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे.

विशेष म्हणजे जे फोटो किंवा पूजाचे निवडणुकीच्या प्रचारातील एडिटेड व्हिडिओ भाजपच्या नेत्यांकडे कसे येत आहेत असा संशय निर्माण झाला होता. त्यात शवविच्छेदन रिपोर्ट समोर आलेला नसताना भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेत बेभान होत आरोप केल्याचं पाहायला मिळालं. चौकशी पूर्ण झालेली नसताना देखील भाजप नेत्यांना का घाई होती यामागील सत्य येण्यास सुरुवात झाली आहे. पूजाचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ एकतर तीच स्वतः देऊ शकते तिचे गॅझेट्स (लॅपटॉप – मोबाईल) ज्यांच्याकडे होते त्यांना ते शक्य होतं. पण ते भाजपच्या ठराविक नेत्यांकडे कसं गेलं याचं भांडं फुटण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक जण भाजप नगरसेवक आहे. पण तेदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी, माहिती देण्यासाठी पुढे आलेले नव्हेते. पूजा चव्हाणनं आत्महत्या केली की भोवळ येऊन पडल्यानं तिचा मृत्यू झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित होता. मात्र माध्यमांकडे स्थानिक पोलिसांच्या सूत्रांकडून आलेल्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार तिला खाली पडल्यानंतर जबर मार लागला आणि तेच तिच्या मृत्यूचं कारण ठरल्याचं म्हटलं जातंय.

पूजा इमारतीमधून पडल्यावर तिथे चार जण उपस्थित होते. अरुण राठोड, अनिल चव्हाण, भाजप नगरसेवक धनराज घोगरे आणि त्यांची पत्नी असे चौघेजण पूजाला घेऊन रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यामुळे हे चौघे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. पोलिसांनी अद्याप त्यांच्या सखोल चौकशीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांच्या हाती आली आहे. भाजप नगरसेवकाने पूजाचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप केला जात आहे. वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड यांचे काही व्हिडीओ नुकतेच समोर आले होते. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं बोललं जातं.

धनराज घोगरे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक आहेत. वानवडी वॉर्डमधून ते भाजपच्या तिकीटावर नगरसेवक झाले. तसेच पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांचं नाव आहे.

पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती, अशी माहिती मिळालीय. आणि त्याच प्रकारचे व्हिडीओही पूजाच्या लॅपटॉपमधूनच समोर आलेत. संजय राठोड मतदारसंघात फिरत असल्याचे, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे फोटो आणि व्हिज्युवल्स घेऊन राठोडांचे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.

युतीच्या काळातही राठोड मंत्री होते. त्यावेळचे व्हिडीओही हाती लागलेले आहेत. समाज माध्यमांवर एखाद्या नेत्यांचा प्रसार करण्यासाठी, जशी गाणी आणि डायलॉग लावून व्हिडीओ तयार केले जातात, अगदी त्याच प्रकारे हे व्हिडीओ तयार करण्यात आलेत. या व्हिडीओवरुन सहज लक्षात येण्यासारखं आहे की, सोशल मीडियावर राठोडांच्या प्रचाराची जबाबदारी, एक तर पूजाकडे होती किंवा पूजा कोणाकडून तरी हे व्हिडीओ बनवून घेत असावी, कारण हे व्हिडीओ तिच्याच लॅपटॉपमधले असल्याचं सांगण्यात आलं.

 

News English Summary: Pooja’s father has also made further revelations while the political controversy is raging. Why are you making baseless allegations while the Pooja police investigation is underway? I’m sorry to hear that my daughter is gone. Even after appealing to stop defamation, the defamation must stop

News English Title: Pune BJP corporator Dhanraj Ghogare allegedly steal Pooja Chavan laptop news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x