29 March 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

ZP Panchayat Election Results 2021 | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फडणवीसांच्या नागपुरात भाजपची दुर्दशा

Panchayat Election Results 2021

मुंबई, ०६ ऑक्टोबर | राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा (ZP Panchayat Election Results 2021) मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे.

ZP Panchayat Election Results 2021. BJP party lost Panchayat Election and Zilla Parishad Elections in Nagpur big setback for Devendra Fadnavis :

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)
भाजप – 33
शिवसेना – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 35
इतर – 38

नागपूर जिल्हा परिषद निकाल – 16
काँग्रेस – 09
भाजपा – 03

नागपूर पंचायत समिति निकाल – 29
काँग्रेस – 21
भाजपा – 05

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले
सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ZP Panchayat Election Results 2021 BJP lost Panchayat Election and Zilla Parishad Elections in Nagpur.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x