12 April 2021 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Covid 19, Corona Virus, Maharashtra

मुंबई, २७ जून : आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८,९६,८७४ नमुन्यांपैकी १,५९,१३३ (१७.७४ टक्के) नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६५,१६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १,५९,१३३ झाली आहे.

सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइन आहेत आणि ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 159133. Today,newly 5318 patients have been identified as positive.Also newly 4430 patients have been cured today,totally 84245 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 67600.

News English Title: Maharashtra State Reports 167 Deaths And 5318 New Covid19 Positive Cases News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1264)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x