29 March 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

भीषण स्थिती! मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण

India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, २८ जून : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. मात्र, आता हा आकडा २० हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या १६,०९५ झाली आहे. तीन लाख ९ हजार ७१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर दोन लाख ३ हजार ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

देशभरात महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यांमध्ये अनुक्रमे १ लाख ५२ हजार ७६५, ७७ हजार २४० आणि ७४ हजार ६२२ रुग्णांची नोंद झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ७९ लाख ९६ हजार ७०७ करोना चाचण्या करण्यात आल्या. गेल्या २४ तासांत २ लाख २० हजार ४७९ नमुना चाचण्या करण्यात आल्याचे शनिवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

News English Summary: In the last 24 hours, 20,000 new corona patients have been found in the country. The prevalence of corona virus in the country has been increasing rapidly over the last few days.

News English Title: 410 Deaths And Highest Single Day Spike Of 19906 New Covid19 Cases In Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x