28 June 2022 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

सुशांत संबंधित बनावट वृत्त | आज तक'ला दंड तर ३ वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश

Aaj Tak, Broadcasters body, Telecasting fake tweets, Sushant Singh suicide

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तसेच या प्रकरणाच्या वृत्तांकनात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ या वाहिन्यांनी जाहीर माफी मागावी, असाही आदेश एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी दिला आहे.

बनावट ट्विटचे प्रसारण करून त्याचा संबंध सुशांतसिंह राजपूतशी जोडल्याबद्दल ‘आज तक’ने वृत्तवाहिनीवरून जाहीर माफी मागावी, असेही या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी सौरव दास यांनी तक्रार केली होती. एनबीएसएच्या आदेशाची माहिती दास यांनी ट्विटरवरून दिली आहे.

सत्यता न तपासताच व्हिडीओ केले प्रसिद्ध
एनबीएसएने म्हटले आहे की, कोणतीही गोष्ट प्रसारित करण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. मात्र, सुशांतसिंह राजपूतशी संबंध जोडून काही ट्विट दाखविताना आज तकने त्याची सत्यता तपासली नाही. या कार्यक्रमाचे यू-ट्युब तसेच ‘आज तक’च्या वेबसाइटवर असलेले व्हिडीओ तत्काळ काढून टाकावेत.

 

News English Summary: The News Broadcasting Standards Authority (NBSA) has imposed a fine of Rs 1 lakh on news broadcasting channel Aaj Tak for telecasting fake tweets related to late actor Sushant Singh Rajput. The channel has also been asked to air an apology, for which the self-governing authority the day. According to Live Law, the self-governing authority has in its order, dating 6 October, asked Aaj Tak along with Zee News, News 24 and India TV to air an apology for insensitive reporting and sensationalizing the actor’s death.

News English Title: NBSA imposed fine on Aaj Tak of 1 lakh rupee for telecasting fake tweets on Sushant Singh death Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x