20 June 2021 3:20 PM
अँप डाउनलोड

देशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, ०७ मे | देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कालच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.

दरम्यान मागील २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.

 

News English Summary: The country is witnessing the corona eruption for the second day in a row. More than four million new corona patients have been found in the last 24 hours. 3 thousand 915 corona victims had to lose their lives. For the second day in a row, the number of corona patients in 24 hours crossed the four lakh mark. In the last 24 hours, 4 lakh 14 thousand 188 new corona patients have been registered in India.

News English Title: The India is witnessing the corona eruption for the second day in a row news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1382)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x