20 September 2021 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
x

दिग्विजय सिंह यांचं भाजपला प्रतिउत्तर | पाकिस्तान हा भाऊ असल्याचे RSS'चे ते जुने विधान केले शेअर

Congress leader Digvijay Singh

नवी दिल्ली, १४ जून | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे क्लब चॅटवरील ऑडियो संभाषणामुळे भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर आले होते. त्यांनी या ऑडियो संभाषणात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर कलम 370 परत लागू करणार असल्याचे म्हटले होते. यावरुन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती. दरम्यान, त्यांनी समाज माध्यमांवर आरएसएसचे 6 वर्ष जूने एक विधान शेअर करत भारतीय जनता पक्षावर पलटवार केला आहे. त्यांनी या विधानावरुन मोहन भागवत यांना पाकिस्तानात पाठवत त्यांची एनआयए चौकशी कराल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपवर पलटवार करत सहा वर्ष जून्या बातमीचा हवाला दिला. ज्यामध्ये आरएसएसने पाकिस्तान आपल्या भावासारखा असून सरकारने त्याच्याशी संबंध दृढ केले पाहिजेत असे म्हटले होते.

व्ही.डी. शर्मा यांनी एनआयए चौकशीची मागणी केली:
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची एनआयए तपासाची मागणी केली होती. ज्यामध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत सिंह यांच्या मोबाईलची चौकशी करण्याची मागणी केली.

 

News Title: Congress leader Digvijay Singh retaliated for speaking on article 370 wrote will Mohan Bhagwat also get NIA investigated news updates.

हॅशटॅग्स

#RSS(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x