26 April 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

हर्षद मेहताचा घोटाळा उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांचं एक ट्विट | आणि शेअर बाजार कोसळला

Sucheta Dalals

नवी दिल्ली, १४ जून | शेअर बाजारात आणखी एक घोटाळा होत असल्याचं सूचक ट्विट हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार कोसळला आहे. अनेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. सुचेता दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक समूह असा उल्लेख केला होता. परंतु, त्यांनी ट्विटमध्ये समूहाचं नाव स्पष्ट केलं नव्हतं.

सेबीकडे असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा. एका समूहाच्या मूल्यात सातत्यानं हेराफेरी सुरू आहे. परदेशातील संस्थांच्या मदतीनं हा सगळा प्रकार सुरू आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्य. काहीच बदललेलं नाही,’ असं ट्विट सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले.

सुचेता दलाल यांच्या ट्विटचा परिणाम शेअर बाजार सुरू होताच लगेच दिसून आला. बाजाराचं कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ध्या टक्क्याची घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३५० अंकांनी खाली आला. विशेष म्हणजे अदानी समूहाच्या ६ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत ५ ते २० टक्क्यांची घसरण झाली. अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅसच्या शेअर्सच्या मूल्यात लक्षणीय घट झाली.

दुसरीकडे, मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहेत. अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. या तिन्ही कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. ‘एनएसडीएल’ने केलेल्या या कारवाईने या कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. ज्यात ३१ मे २०२१ पूर्वी अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. मालकी हक्क आणि लाभार्थीं यांच्या बाबत अपुरी माहिती दिल्याचे ‘एनएसडीएल’च्या निदर्शनात आले आहे. मनी लॉंडरिंग कायदाअंतर्गत डिपॉझिटरीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अदानी समूहातील बड्या गुंतवणूकादांची झालेली कोंडी अदानी समूहाचा झटका मानला जात आहे.

 

News Title: Sensex dips by 350 points Adani Group stocks tumble after Sucheta Dalals shocking tweet news updates.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x