मोदींच्या उद्याच्या दिवा-बत्ती घोषणेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप
नवी दिल्ली, ४ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत ६०१ करोनाचे रुग्ण वाढले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात एकूण ६८ जण दगावलेत. तर करोनाच्या रुग्णांची देशातील एकूण संख्या ही २९०२ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात १८३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभर सध्या चिंतेचं आणि भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.
तत्पूर्वी कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांची एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील लाईट्स बंद करण्याचं आवाहन केलं. मात्र मोदींच्या आवाहनामुळे ऊर्जा मंत्रालयाची चिंता वाढली आहे. लोकांनी अचानक विजेचा वापर बंद केल्यास त्याचा ग्रीडवर विपरित परिणाम होण्याची चिंता ऊर्जा मंत्रालयाला सतावते आहे. त्यामुळे अशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वीज विभागातले कर्मचारी कामाला लागले आहेत.
उद्या रात्री नऊ वाजता देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी विजेचा वापर बंद केल्यास ग्रीडवरील भार अतिशय कमी होईल. हा भार शून्याच्या आसपास असल्यास फिडर्स आणि उपकेंद्रांवर परिणाम होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ऊर्जा विभागाकडून विशेष तयारी केली जात आहे. भार शून्यावर येऊ नये यासाठी उपकेंद्रावरील कॅपिसेटर बँक उघडले जातील. याशिवाय जास्त क्षमतेच्या उपकेंद्रांवरील रिऍक्टर सुरू केले जातील. नऊ वाजता अचानक ग्रिडवरील भार शून्यावर येऊ नये आणि नऊ वाजून नऊ मिनिटांनी तो अचानक वाढू नये यासाठी उपकेंद्रांवर कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. संध्याकाळी ७ ते रात्री ११ अशी त्यांची कामकाजाची वेळ असेल.
दरम्यान, हुल्लडबाज देशभक्तांचा मागील अनुभव पाहता स्वतः भारतीय लष्करानेच अपघात होऊ नये म्हणून गर्भित इशारा देताना महत्वाची सूचना केली आहे. कोविड-१९ विरोधातील लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित करत असताना देशवासियांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, रविवारी ५ एप्रिल रोजी मेणबत्ती तसेच दिवा पेटवत असताना काळजी घ्या. हात धूण्यासाठी साबणाचा वापर करा. जे सँनिटायझर वापरणार आहात ते अल्कोहलमुक्त असेल याचीही दक्षता घ्या, असे लष्कराने म्हटले आहे.
On 5th April, let us be careful while lighting diyas or candles. Use soap to wash your hands and not alcohol-based sanitizers prior to lighting: Indian Army pic.twitter.com/sTU9VFYaCE
— ANI (@ANI) April 4, 2020
News English Summary: PM Narendra Modi called for shutting down the house lights for nine minutes on April 5 at 9 pm to show the unity of the countrymen in the fight against Corona. However, Modi’s call has raised concerns about the energy ministry. The Ministry of Energy is worried that the sudden shutdown of electricity will affect the grid. So that no such problem can be created, the employees of the power department are working. If the billions of citizens of the country stop using electricity at 9 pm tomorrow, the load on the grid will be greatly reduced. If this load is close to zero, it can affect the feeders and sub centers. Special preparations are being made by the Department of Energy to prevent such a situation from occurring. The capacitor banks at the epicenter will be opened so that the load does not fall to zero.
News English Title: Story corona virus Union ministry power gives important instructions after Prime Minister Narendra Modi appeals turn lights 9 minutes News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट