24 September 2020 10:26 PM
अँप डाउनलोड

अमित शहांच्या कार्यक्रमात योगा करून लोकं गरीब झाले; आयोजकांच्या चटई चोरून पळाले

Amit Shah, Narendra Modi, International Yoga Day

हरियाणा : आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत रोहतक येथे योग दिवस साजरा केला. पंतप्रधानांचा कार्यक्रम जवळपास ४० हजार लोकांसह सुरळीत पार पडला पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कार्यक्रमात लोकांनी चक्क अंथरलेल्या चटई पळवल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सदर कार्यक्रम संपवून अमित शहा बाहेर गेल्यानंतर चटई पळवण्यासाठी लोकांमध्ये झुंबड उडाली. चटई घेऊन जाऊ नका, अशी जाहीर सूचना आयोजकांनी केली परंतु लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चटई पळवण्यावर लक्ष केंद्रित केले. इतकेच नाही तर लोकांनी चटईसाठी आयोजकांशी वाद घालण्यासही सुरुवात केली. तर काहींनी चटई घेऊन सरळ घरचा रस्ता धरला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x