14 December 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

धक्कादायक! राज्यात ३ महिन्यात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Devendra Fadanvis

मुंबई : यावर्षीच्या जानेवारी ते मार्च ३ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सहकार आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. यामधली १९२ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. ज्यापैकी १८२ प्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. दरम्यान एकूण ९६ प्रकरणं निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आली. तर ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत अशी देखील माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. सदर विषयाला अनुसरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी लक्ष वेधले होते ज्यावर देशमुख यांनी सभागृहाला हे उत्तर दिले.

दरम्यान २०१५ ते २०१८ या कार्यकाळात विचार केला तर एकूण १२,०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे शासनाच्या नोंदणीवर आली आहेत. ज्यापैकी ६,५८८ प्रकरणे निकषात असल्याने पात्र ठरवण्यात आली. सदर प्रकारणांपैकी एकूण ६,८४५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना १ लाख रूपयांची मदत देण्यात आल्याचे सभागृहाला सांगितले.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना राबवली. असे असतानाही मागील ४ वर्षांत शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, बोंडअळी प्रादुर्भावामुळे बाधित शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे १२,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशीही माहिती देशमुख यांनी दिली.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x