18 November 2019 12:16 AM
अँप डाउनलोड

बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर

नंदुरबार : नंदुरबारच्या शहाडामध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. परंतु त्याला काही वेळातच हिंसक वळण लागल्याने अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्याने बंद दरम्यान हिंसक वळण लागल्याने अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर पोलीस ठाण्यालाच घेराव घालून गुन्हे मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. आज या ठिकाणी खासदार राजू शेट्टी भेट देणार असल्याने शहाडामध्ये वातावरण थोडे तापले आहे.

शेतमालाला हमीभावप्रमाणे खरेदी तसेच शासनाकडून ठरलेल्या आधारभूत किमतीत ठरलेल्या भावात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा आणि हमीभावानुसार खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या