27 July 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

उद्धव ठाकरे साहेब उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे उभे : एकनाथ शिंदे

मुंबई : कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

एकूणच आमदार प्रकाश सुर्वे आयोजित ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलन म्हणजे “उत्तर भारतीयो के सन्मान मे आमदार प्रकाश सुर्वे मैदानमे ” असे चित्र या संमेलनात होते. येत्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार महत्वाची भूमिका बजावणार असल्याने शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांना साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मुंबईत जेंव्हा उत्तर भारतीयांना काही जणांनी मारपीठ केली होती,त्यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती असे गौरवोद्गार मंत्रीमहोदय एकनाथ शिंदे यांनी काढले. आमचा पक्ष सदैव उत्तर भारतीय समाजाच्या पाठीशी उभा आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भसरतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेत महत्वाची पद देण्यात आल्याची आठवण सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला करून दिली. तसेच ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलन’ यशस्वी केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आमदार सुर्वे यांचे तोंड भरून कौतुक केले. यापुढेही उत्तर भारतीय आणि शिवसेना पक्षाचे नाते वाढीस लागो अशी इच्छा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाला विशेष भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित शिवसेना नेत्यांकडून सुद्धा या कार्यक्रमाला मोठी दाद दिली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x