29 April 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

SSC Result 2021 | वेबसाइट क्रॅश, हॉलतिकीटच दिलं गेलं नसल्याने क्रमांकच माहीत नाही, निकाल कसा पहावा?

SSC Result 2021

मुंबई, १६ जुलै | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येतात. परंतु गेल्या वर्षी पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळाच भरल्या नाहीत. तर कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षाही रद्द करत नववीच्या मूल्यांकनावर आधारित दहावीचे मूल्यांकन करत ऑनलाइन निकाल राज्यमंडळाच्या mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahasscboard.in वेबसाइटवर जाहिर केला. मात्र विद्यार्थ्यांना पाहता येत नसल्याने हिरमोड झाला आहे. २:३० वाजले तरी विद्यार्थ्यांना ते पास झालेत की नाही पाहता आलेले नाही. असे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सांगितले. या संदर्भात बोर्डातील अधिकाऱ्यांनाही पालकांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता एकाचवेळी अनेकजण वेबसाइट पाहत आहेत. तांत्रिक अडचण असून, राज्यमंडळ वेबसाइटवर संपूर्ण निकाल अपलोड करत असल्याने ही अडचण आहे. थोडावेळात तांत्रिक अडचण दूर होऊन निकाल पाहता येईल असे सांगितले.

वेबसाइट क्रॅश आणि बैठक क्रमांकही माहीत नाही:
दरम्यान निकालानंतर वेबसाइट क्रॅश झाली असतांनाच अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याने शाळांनी हॉलतिकीटच वितरित केले नाही. परिणामी निकाल जाहिर झाला असला तरी बैठक क्रमांक नसल्याने आम्ही निकाल पहावा तरी कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. तर आईचे नाव आणि जन्मतारीख टाकूनही निकाल पाहता येत असल्याचे मंडळाने यापूर्वी कळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॉलतिकीट क्रमांकच नसल्याने काय करावं हे शालेय शिक्षण मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं:

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: SSC Result 2021 website crash due to overload news updates.

हॅशटॅग्स

#SSC(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x