13 April 2021 7:21 PM
अँप डाउनलोड

राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार

Rahul Gandhi, Congress, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. युपीतील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवण्याला राहुल गांधींनी सहमती दर्शवली आहे. अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(474)#Rahul Gandhi(218)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x