16 December 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुख्यमंत्री शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच शिंदे गटातील खासदाराचे लोकसभेत हास्यास्पद दावे? संसदेत राजकीय स्टंटबाजी प्रश्न?

Shinde Camp

Shinde Camp MP Rahul Shewale | अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर हास्यास्पद प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा नावाचा उल्लेखच शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. लोकसभेत आज ड्रग विधेयकाच्या चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी बाजू मांडली. यावेळी राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य – उद्धव यांचे नाव घेतले आहे.

सुशांत आणि दिशा सालियान यांच्या फोनमध्ये काय बोलणं झालं होतं? तिचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून का घेतला? रिया चक्रवर्तीचा मोबाईल तपासला का, तिच्या मोबाईलमध्ये AU हा नंबर सेव्ह होता. त्यावर 44 फोन आले होते, AU ला अनन्या उद्धव असं सांगितलं आहे. पण बिहार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आदित्य आणि उद्धव ठाकरे असं नाव समोर आलं होतं, असा दावाच शेवाळे यांनी केला आहे.

मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा कारवाई करते तेव्हा हायप्रोफाईल प्रकरणातच हस्तक्षेप करत असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी 3 स्तरावर चौकशी झाली होती. सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनी चौकशी केली होती. पण, यामध्ये अजूनही काही प्रश्न आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला आहे? अशी विचारणा राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

वास्तविक, हे प्रकरण त्यावेळी केवळ बिहार निवडणुकीच्या तोंडावर उचलण्यात आलं होतं, ज्या प्रकरणाचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता हे अनेकदा समोर आलं आहे. तसेच प्रकरण सीएबीआय’कडे जाऊनही अनेक वर्ष कोणतही तथ्य समोर न येणं हेच त्या आरोपा मागील राजकारण सिद्ध करत. यावर आरटीआय मार्फतही माहिती मागविण्यात आली होती. मात्र काहीच तथ्य नसल्याने नेमकी काय माहिती द्यावी हे देखील प्रश्नार्थक होतं. त्यामुळे त्यावरही सीबीआयने म्हटले होते की, “सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे, प्रोग्रेसबद्दलच्या माहितीमुळे तपासाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, मागितलेली माहिती पुरवली जाऊ शकत नाही,” असं सीबीआयने आरटीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना. यासंदभार्त एएएनआय’ने अधिकृत 7,एप्रिल 2022 रोजी माहिती दिली होती.

दिशाचा मृत्यू – सीबीआयचा निष्कर्ष
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला होता.

शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरले गेल्याने?
त्यामुळे सध्या शिंदे गटाच्या खासदाराने संसदेत उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरले गेल्याने खळबळ माजवण्याच्या हेतूने हे आरोप केले गेल्याचं म्हटलं जातंय. मात्र यातून राजकीय दृष्ट्या शिंदे गट बावचळल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp MP Rahul Shewale on Aaditya Thackeray check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

#Shinde Camp(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x