5 May 2024 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीज IPO मध्ये गुंतवणूकदारांची मोठी बोली, 70 पट सबस्क्राईब झाला, तुम्ही पैसे गुंतवणार?

Kfin Technologies IPO

KFin Technologies IPO|  KFin Technologies कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अद्भूत प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केल्यावर दुसऱ्या दिवशी 70 टक्के सबस्क्राइब झाला आहे. NSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार IPO च्या दुसऱ्या दिवशी 1,66,01,920 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. हा IPO सोमवारी खुल्या बाजारात गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला होता. आज 21 डिसेंबर 2022 ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख होती.

केफिन टेक्नॉलॉजीज कंपनी मुख्यतः वित्तीय सेवा क्षेत्रात उद्योग करते ही कंपनी आपल्या IPO द्वारे खुल्या बाजारातून 1500 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीने हा IPO संपूर्णपणे OFS अंतर्गत जाहीर केला आहे. याचा अर्थ कंपनी या IPO द्वारे ही फंड जमा करेल, तो सर्व पैसा कंपनीच्या प्रवर्तक आणि शेअर्स विक्री करणाऱ्या गुंतवणुकदारांना दिला जाणार आहे.

या व्यतिरिक्त, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स साठी 129,68,300 इक्विटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते, मात्र त्यावर 1,32,00,520 इक्विटी शेअर्ससाठी म्हणजेच 1.02 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. या IPO मध्ये FII नी 36,17,360 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी 87,88,520 इक्विटी शेअर्सवर बोली लावली आहे. IPO च्या दुसऱ्या दिवशी म्युच्युअल फंडांकडून 7,94,640 इक्विटी शेअर्सची सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे.

दरम्यान, किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये 31,90,280 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 64,84,149 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे.

IPO लिस्टिंग 29 डिसेंबर रोजी :
या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 347-366 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. हा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट मध्ये सूचीबद्ध केला जाईल. कंपनीने IPO जाहीर करण्या आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून 675 कोटी रुपये भांडवल जमा केले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1 लॉट साठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. एक लॉटसाठी किरकोळ गुंतवणुकदारांना 14640 रुपये जमा करावे लागतील. आणि ते कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Kfin Technologies IPO subscribed multiple times up to 21 December 2022.

हॅशटॅग्स

#KFin Technologies IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x