28 September 2020 8:51 PM
अँप डाउनलोड

मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; एमपी गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

भोपाळ : मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी होईल असा अहवाल मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने दिल्याने भाजपची धाकधूक वाढली आहे. या गोपनीय अहवालात राज्यातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक म्हणजे १२८ जागांवर आघाडी घेईल तर भाजपच्या जागा घटून थेट ९२ वर येतील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संबंधित गोपनीय अहवाल गुप्तचर विभागाने ३० आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुपूर्द केल्याचे वृत्त इंडिया टुडे या नियतकालिकाने दिले आहे. त्यानुसार एकूण २३० जागांपैकी १२८ जागांवर काँग्रेस विजयी होऊन बहुमत मिळवेल असं म्हटलं आहे. तर विद्यमान भाजप सरकारच्या जागा घटून त्या थेट ९२ पर्यंत घटतील असं म्हटलं आहे. दरम्यान, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या वाट्याला ६ जागा येतील तर अखिलेश यादव यांच्या सपा’ला केवळ ३ जागांवर विजय प्राप्त करता येईल. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला केवळ १ जागा मिळेल असं या गोपनीय अहवालात म्हटलं आहे.

परंतु सलग १५ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपसाठी ही एक अत्यंत वाईट बातमी आहे. त्यात मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी होईल, असा अहवाल दिल्याने केंद्रातील आणि राज्यातील भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे विद्यमान भाजप सरकारमधील रुस्तम सिंग, माया सिंग, गौरीशंकर शेजवर आणि सुर्यप्रकाश मीना यांच्यासह तब्बल दहा मंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागू शकते, असे अहवाल सांगतो. त्यात मीना हे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळेच हा गुप्तचर खात्याचा अहवाल समोर येताच २ दिवसांनी, म्हणजे १ नोव्हेंबर रोजी मीना यांनी आपण निवडणुकीसाठी उभे रहात नसल्याचे जाहीर केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1321)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x