26 April 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मोठी घोषणा | शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार

Farmers protest, Mahatma Gandhi Jayanti, Rakesh Tikait

नवी दिल्ली, ०६ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.

संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात आला. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं गेलं. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं होते की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्‍का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील. राकेश टिकैत म्हणाले होते की, “चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला होता.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशाची सीमा असलेल्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनाचं नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. केंद्र सरकार तिनही कृषी कायदे रद्द करेल तेव्हाच आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. आता मात्र 2 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

 

News English Summary: It has been announced that the farmers’ agitation on the Ghazipur border against the Central Government’s Agriculture Act will continue till Mahatma Gandhi Jayanti, i.e. October 2. Indian Farmers Union leader Rakesh Tikait has made this big announcement. The farmers’ agitation has been going on for the last 73 days on the border of the capital Delhi. Despite several rounds of discussions between the central government and farmers’ leaders, the issue has yet to be resolved. In such a situation, it has been announced that the farmers’ agitation on the Ghazipur border will continue till October 2.

News English Title: Farmers protest will continue till Mahatma Gandhi Jayanti said Rakesh Tikait news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x