15 June 2021 9:21 PM
अँप डाउनलोड

सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार: केंद्र

नवी दिल्ली : आज नवी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही तरी निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नसून उलट सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. बैठकीत वाढत्या किमतीबाबत काहीच निर्णय न होताच बैठक संपली. तसेच देशात पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱ्या कराचा वापर केंद्र सरकार महामार्ग तसेच एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करत असते असं माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्राच्या या निर्णयने येत्या काळात वाहतुक खर्चात प्रचंड वाढ होऊन त्याचा परिणाम महागाई होण्यात सुद्धा होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1591)BJP(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x