20 April 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा | त्यांना शिवसेनेत स्थान आणि सन्मान मिळेल - गुलाबराव पाटील

Pankaja Munde

जळगाव, ३१ जुलै | भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत असतानाचा आता त्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना ​शिवसेनेत स्थान व सन्मान मिळेल, अशी हमी देखील गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील कीनोद गावात मंत्री गुलाबराव पाटील हे काल एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले.

पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pankaja Munde should join Shivsena said minister Gulabrao Patil news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x