यवतमाळ : कोणताही ठोस पुरावा नसताना थेट ‘नरभक्षक’ ठरवून टी-१ ‘अव्नी’ वाघिणीला शोधपथकाने अखेर ठार मारले आहे. या टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून वनविभागाची शोध मोहीम सुरू होती. काल रात्री वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकावर हल्ला केल्याच्या बहाण्याने तिला गोळी झाडून ठार करण्यात आले असा आरोप प्राणिमित्रांनी केला आहे. बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत राळेगण परिसरात हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.

परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता अव्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बछाड्यांना गाठून बेशुद्ध करणार की त्यांना सुद्धा ठार मारणार हा कळीचा मुद्दा झाला आहे. दरम्यान, क्रूर शिकारी अलीने ‘अव्नी’ला गोळ्याच घातल्याचा आरोप अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचे प्राणीमित्र पी व्ही सुब्रमण्यम यांनी वनविभागावर आणि शोध पथकावर केला आहे. एका खाजगी शिकाऱ्याने अव्नीला क्रूरपणे ठार केले. तसेच याला मंत्र्यांनी आणि वन अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना पाठींबा दिला आहे. असे प्रकार होत असतील तर देशातील आपले वन्यजीव कसेकाय वाचणार? असा सवाल पी व्ही सुब्रमण्यम यांनी उपस्थित केला आहे.

‘नरभक्षक’ ठरवून अव्नीला ठार करण्यात आले आहे आणि आता तिचे अकरा महिन्यांचे २ बछडे जंगलात आईविना जास्त एकटे जास्त काळ जगू शकणार नाहीत. तसेच जगण्यासाठी त्यांना खाद्य न मिळाल्यास त्यांचा जंगलात मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे त्या २ बछड्यांना ठार न मारता जिवंत पकडण्याची मागणी प्राणीप्रेमी करत आहेत. अव्नीला जेरबंद करण्यासाठी मोहिमेसाठी ५ शार्पशुटर, ३ मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचाऱ्यांची फौज जंगलात उतरविण्यात आली होती.

man eater tigress avni t1 killed in yavatmal forest by searching team