26 April 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

महाराष्ट्रात येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार | राज्य सरकारचा निर्णय

Cinema halls reopen

मुंबई, २५ सप्टेंबर | कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत.

महाराष्ट्रात येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय – Cinema halls in Maharashtra will open from 22 October :

पेन स्टुडिओचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक -निर्माता रोहित शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

या बैठकीला टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Cinema halls in Maharashtra will open from 22 October.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x