14 December 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस नकार | भाजपावर फेसबुक मेहेरबान

Citing Business Reasons, Facebook Opposed Action, Bjp Linked Hate Posts, Wall Street Journal Report

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट : अमेरिकेत लवकरच निवडणुका होत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पक्षपाती भूमिका घेण्याबाबतचा आरोप झालेले ट्विटर आणि फेसबुकने नवे नियम तयार केले. आता भारतातही फेसबुकच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत ट्विट केले आहे. विविध लोकशाही देशांमध्ये फेसबुकचे वेगवेगळी मानके का आहेत?, हा कोणत्या प्रकारचा निष्पक्ष मंच आहे?, हा रिपोर्ट भाजपसाठी नुकसानकारक आहे- या वेळेला भाजपच्या फेसबुकशी असलेल्या संबंधाबाबतचा खुलासा झाला आहे आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर भाजपच्या नियंत्रण करण्याच स्वभावही उघड झाला आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या मुद्द्यावर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना घेरले आहे. दिग्विजय सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र यांचे समर्थक अंखी दास यांना फेसबुकमध्ये नियुक्त केले गेले. ते मुस्लिम विरोधी पोस्ट सोशल मीडियावर अप्रूव्ह करत असतात. या वरून तुम्ही हे सिद्ध केलेत की तुम्ही जो उपदेश करता त्याचे पालन करत नाही.’

दरम्यान, द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.

रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. “भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

रिपोर्टमध्ये भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचं आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, “अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीनं सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.”

फेसबुकच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की, कंपनीच्या धोरणानुसार आमदाराचं खात बंद करण्यात यावं, असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं आहे. यावर फेसबुकचे प्रवक्ते एंडी स्टोन यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, “दास यांनी राजकीय पडसादांविषयी चिंता व्यक्त केली होती. पण, सिंह यांना फेसबुकवर बंदी न घालण्याची इतरही अनेक कारणं आहेत,” असं स्टोन यांनी सांगितलं.

 

News English Summary: In what highlights the challenges of policing content by social media platforms, The Wall Street Journal has reported that citing business imperatives, Facebook’s top public policy executive in India “opposed applying hate-speech rules” to at least four individuals and groups linked with the BJP despite the fact that they were “flagged internally for promoting or participating in violence.”

News English Title: Citing Business Reasons Facebook Opposed Action On BJP Linked Hate Posts Wall Street Journal Report News latest Updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x