23 September 2021 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

पिंपरीत मंदिर परिसरालगत २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : पिंपरीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यातील एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिंजवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. चौकशीअंती पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलं असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचं नाव गणेश निकम असून त्याच वय २२ वर्ष आहे. या पीडित २ अल्पवयीन मुली रविवारी मंदिर परिसरात खेळायला गेल्या असता, आरोपी गणेश तसेच त्याच्या अजून एका साथीदाराने त्या मुलींचा पाठलाग केला. त्या गरीब घरातील असल्याने त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिरामागील जंगलात घेऊन गेले आणि बलात्कार केला. त्यानंतर या प्रकाराबाबत कुठेही माहिती दिली तर जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी या मुलींना दिला होती असं पोलिसांनी सांगितलं.

आरोपीच्या धमकीमुळे भेदरलेल्या मुलींनी कुठेही घडल्या प्रकाराबद्दल तोंड उघडलं नाही. पीडित मुलींचे पालक गरीब असून ते उसतोड कामगार असल्याचं समोर आलं आहे. परंतु घडला प्रकार तेव्हा उजेडात आला जेव्हा मंगळवारी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी यातील एका मुलीची प्रकृती खालावल्यानं पालकांनी तिला तातडीनं जवळच्या इस्पितळात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर ताबडतोब ही गंभीर आणि हादरवणारी बाब समजल्यानंतर पोलिसांना याबाबतची सर्व माहिती देण्यात आली. परंतु, मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळवण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती. दरम्यान, त्यापैकी दुसऱ्या मुलीने अखेर धाडस करुन कुटुंबीयांना सर्व घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपासाअंती दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x