27 April 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी चर्चा, ते म्हणाले 'ठिक है' - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई, १० ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रश्न लटकल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

मागील ४ दिवसांचा दिल्ली दौरा आटोपून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांना दिली. राज यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे केंद्रीय नेतृत्वाला सांगितले. त्यावर आमच्या नेतृत्वाने ठिक है, एवढीच प्रतिक्रिया दिली. आमचे केंद्रीय नेते फार कमी बोलतात. आपल्या बोलण्यातून सिग्नल देईल एवढं सिंपल आमचं नेतृत्व नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

संघटनेचे प्रमुख नड्डा, संघटन चालवणारे संतोष आहेत. त्यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भेटीमुळे रेड अलर्ट द्यायचा असता किंवा या भेटीमुळे ते माझ्यावर नाराज असते तर हे नेतेही मला भेटले नसते. नाराजी असती तर नितीन गडकरी, नड्डा आणि संतोषजींनी भेट नाकारली असती. गडकरी म्हणजे महाराष्ट्र आहे. गडकरींनी आम्हाला साग्रसंगीत जेवणही दिलं, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: I have discuss with BJP national president JP Nadda regarding meeting with Raj Thackeray said Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x