19 October 2021 7:56 AM
अँप डाउनलोड

पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच संघाच्या कार्यक्रमात बोलताना संघाच्या विचारधारेवर भाष्य केलं होत. दरम्यान, त्या विषयी बोलताना मोहन भागवत यांनी सांगितलं होत की, ‘आरएसएस ही लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ कोणाच्याही विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान तसेच चर्चा केली जाते’.

सरसंघचालकांच्या याच विधानाचा दाखल देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा या संघाच्या दोन ‘वर्गा बाहेरील विद्यार्थ्यां’ना मार्मिक चिमटे काढले आहेत. म्हणजे अगदी संघाच्या कुशीत वाढलेला एक विद्यार्थीच मोहन भागवतांना संघातील त्याच लोकशाही तसेच एकाधिकारशाहीला विरोध करणाऱ्या “२ वर्गाबाहेरील विद्यार्थ्यांबद्दल” प्रश्न उपस्थित करताना विचारात आहे की, ‘संघाने जी शिकवण आम्हाला आजपर्यंत दिली, ती मोदींना आणि ‘धाकदपट शहा’ (अमित शहा) यांना का दिली गेली नाही?’ असा रोखठोक प्रश्न करताना व्यंगचित्रात दाखवलं आहे.

सध्या देशातील सर्वच सरकारी यंत्रणा मोदींच्या पायाशी लोटांगण घालून आहे आणि ‘मोदी कृपेने’ अमित शहा सुद्धा त्या समस्त यंत्रणेला रुबाबदारपणे पायाखाली ठेवून आहेत, असं मार्मिकपणे दाखविण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं ते मार्मिक व्यंगचित्र?

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x