19 October 2021 7:53 AM
अँप डाउनलोड

भाजप आमदाराच्या वक्तव्याने महिलांमध्ये संतापाची लाट

नवी दिल्ली : मुलींनो तुमच्यावर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर आधी बॉयफ्रेंड बनवणे सोडा हे विधान केलं आहे मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी. त्यावर महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्या विचारात आहेत की, इथे रोज ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींवर सुद्धा कुठल्यातरी विकृताकडून बलात्काराच्या घटना रोज देशभरात घडत आहेत, म्हणजे त्या ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींनासुद्धा बॉय फ्रेंड असतो का अशा तीव्र प्रतिकिया महिला नोंदवत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपचे हे महोदय इतक्यावरच थांबले नाही तर पुढे ते असे बरगळले की, आपल्या देशात महिलांची ४ वेळा पूजा केली जाते आणि असे असेल तरी आम्ही कसे म्हणावे की महिलांवर अत्याचार होतो. इतकंच नाही तर महिलांवरील अत्याचाराचे आकडे दिवसेंदिवस वाढतच असताना भाजपचे हे महोदय पुढे असे ही म्हणाले की, आकडे काहीही सांगतात.

पुढे मुलींना सल्ला देताना भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य बरगळले की, ‘मुलींनो, जर तुमच्यावरील अत्याचार रोखायचे असतील तर पहिलं बॉयफ्रेंड बनवणे सोडून द्या. तुम्ही जर बॉयफ्रेंड बनवला नाही तर तुमच्यावर अत्याचार होणार नाहीत, अशी मुक्ताफळं या महाशयांनी एका महाविद्यालयातील कार्यक्रमात उधळली आहेत.

महिलावर्गातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

अनेक महिलांनी प्रश्न केला की, इथे रोज ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींवर सुद्धा कुठल्यातरी विकृताकडून बलात्कार होण्याच्या घटना रोज देशभरात घडत आहेत, म्हणजे त्या बलात्काराच्या बळी ठरलेल्या ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींनासुद्धा बॉय फ्रेंड असतो का अशा तीव्र प्रतिकिया महिला नोंदवत आहेत.

काही महिलांनी ‘निर्भयाचं’ उदाहरण देत संताप व्यक्त केला. तर महाराष्ट्रातून सुद्धा भाजप विरुद्ध संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया महिलावर्गातून उमटत आहेत. काही महिलांनी थेट ‘मोदींच्या मन की बात’ चा दाखला दिला की, भाजप जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेंव्हापासून महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यासाठी काय उपाय योजना आखल्या जात आहेत हे आम्ही मोदींच्या ‘मन कि बात’ मध्ये कधीच ऐकले नाही. उलटपक्षी असेच म्हणावे लागेल की हे सरकार महिलांप्रती विचारशून्य आहे, त्यामुळेच ही अशी वक्तव्य भाजपचे नेते करत आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x