27 September 2022 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

भारती पवार, कपिल पाटील, कराडांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली | पण यात एकच अतिशहाणा निघाला - संजय राऊत

MP Sanjay Raut

नाशिक, २८ ऑगस्ट | शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

भारती पवार, कपिल पाटील, कराडांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली, पण यात एकच अतिशहाणा निघाला – Shivsena MP Sanjay Raut criticized Narayan Rane over his Jan Ashirwad politics :

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले.

राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती”, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  Shivsena MP Sanjay Raut criticized Narayan Rane over his Jan Ashirwad politics news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x