14 November 2019 1:04 PM
अँप डाउनलोड

VIDEO: आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होणार; शर्मिला ठाकरे साधेपणाने आंदोलकांमध्ये सहभागी

Aarey Colony, Environment

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वनस्पती तज्ज्ञांनीही अनुकूलता दाखविली. मात्र, यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून, कारशेड उभारणाऱ्या कंपनीने तीन तज्ज्ञांना एकूण दीड कोटी रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी केला. नियमबाह्य पद्धतीने पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर केल्याने, या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण पुन्हा पेटले आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी भाजपने आपला महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असताना झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला आठ मते मिळाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या पाचपैकी तीन तज्ज्ञांनी समर्थन दिले. मात्र, समर्थन करणारे चंद्रकांत साळुंखे, सुभाष पाटणे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तज्ज्ञांना आयुक्तांनी दालनात बोलावून, पदावरून हटविण्याची धमकी दिली होती, असा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, आज स्वतः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील अत्यंत साधे पणाने आरे कॉलनीतील आंदोलकांना भेटून आणि गंभीर विषयावर पाठिंबा दर्शवून आल्या. यावेळी त्यांनी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडांचं आणि जंगलाचं महत्व देखील उपस्थितांना पटवून दिलं. त्यावेळी निर्दर्शन करणाऱ्या लोकांना देखील शर्मिला ठाकरे यांचा साधेपणा भावल्याचे पाहायला मिळाले. वर्षभरापूर्वी देखील त्यांनी मनसेतर्फे येथे मोठा मोर्चा काढून प्रशासनाला मुंबईचं फुफ्फुस असलेल्या आरे कॉलनीचं आणि त्यातील हजारो वृक्षांचं महत्व पटवून दिलं होतं. मात्र यावेळी देखील त्या स्वतः एका सामान्य जवाबदार नागरिकाप्रमाणे येथे आंदोलकांसोबत मिसळल्याचे पाहायला मिळले. विशेष म्हणजे यांचं आरे कॉलनी आणि संजय गांधी उद्यानातील जंगलाचं महत्व राज ठाकरे यांनी २०१४ मध्येच ब्लू-प्रिंट’मध्ये अधोरेखित केलं होतं.

मेट्रो कारशेडमुळे आरेतील झाडांची मोठ्या प्रमाणत कत्तल होणार असून, गेल्या काही वर्षांपासून सेव्ह आरेच्या माध्यमातून विरोध होत आहे. मात्र तरी देखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याने आज पुन्हा एकदा मुंबईकर रस्त्यावर उतरले. तसेच सीएसटी स्टेशन व्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागात मेट्रो प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावेळी आरे बचावचा लढा हा पूर्ण आरे जंगल संरक्षित करण्याचा असल्याचे सेव्ह आरेच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो कारशेड, मेट्रो भवन, प्राणी संग्रहालय, आर टी ओ कार्यालय, SRA या सगळ्याला मुंबईकरांचा विरोध असल्याचे देखील सांगण्यात आले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(471)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या